शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
नाशिक येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शिक्षकांच्या "शिक्षक मित्र चषक" टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू कामगिरीने कोल्हापूर जिल्हयाला अजिंक्यपद मिळवून दिलेबद्दल उर्दू विद्या मंदिर दत्तवाडचे अध्यापक वसिम पटेल यांचा सत्कार करणेत आला.
केंद्रीय शाळा कन्या शाळेचे केंद्रमुख्याध्यापक श्री.राजू जुगळे यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक महंमदशफी पटेल, बांबरवाडी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे, रावसाहेब पाटील,काबिलपाशा पटेल, भालचंद्र खोत,शरद अवघडी उपस्थित होते.
