हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
घोसरवाड येथे संपन्न झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेत कुमार विद्या मंदिर हेरवाड शाळेने दैदिप्यमान यश संपादन केले.
कबड्डीमध्ये मोठया गटातील मुलांनी अजिंक्यपद पटकावले. 4x 100 मीटर मोठा गट रिलेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला.
मोठा गट100 मीटर धावणे मध्ये जियान समीर मुल्ला याने द्वितीय क्रमांक तर लहान गटात श्रीवर्धन सागर आडे याने तृतीय क्रमांक पटकावला. 200 मीटर धावणे मोठा गटात अनिकेत अमोल शिंदे यानेही द्वितीय क्रमांक मिळविला.400 मीटर धावणे मोठ्या गटात समर्थ पंकज नेर्ले याने प्रथम क्रमांक पटकावला.600 मीटर धावणे मध्ये उध्दव राजकिशोर ढोणे यांने प्रथम क्रमांक मिळविला. उंच उडी मोठया गटात उद्धव राजकिशोर ढोणे याने प्रथम क्रमांक तर लहान गटात वरद गजानन पाटील याने द्वितीय क्रमांक मिळविला.
तर कुस्ती लहान गट 25 किलो वजनी गटात समर्थ लक्ष्मण इटाज याने द्वितीय क्रमांक मिळविला. मोठया गटात 35 किलो वजनी गटात संस्कार कृष्णा देबाजे याने द्वितीय क्रमांक मिळविला.45 किलो वजनी गटात आयुष काशिनाथ पोवार यानेही द्वितीय क्रमांक मिळविला.
मुख्याध्यापक राजाराम खोत,अध्यापक -रविंद्र सिदनाळे,संजय गायकवाड,चंद्रकांत कांबळे अध्यापिका -दिपाली मलिकवाडे, गौरी जानवेकर, वर्षा सुतार,मिनल हजारे, फरिदाबेगम अत्तार यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. क्रीडा स्पर्धेतील या दैदिप्यमान यशाबद्दल हेरवाडमध्ये कौतुक होत आहे.
