Top News

निपाणी तहसीलदार ,आहार विभागच्या संयुक्त कामगिरीमुळे रेशन धान्य तस्कर गजाआड

 


    अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

   कर्नाटक सरकार ने गरीबी निर्मुलन साठी रेशनकार्ड धारकांना एका व्यक्ती ला महिना दहा किलो तांदूळ देत आहे. मात्र लाभार्थी कडुन याचा गैरवापर होताना दिसुन येत आहे. गावागावातून रेशनला मिळणारे कमी भावाचे तांदूळ,दुसरीकडे दाम दुप्पटीने विक्री करणाऱ्या तांदूळ तस्करांना अखेर मंगळवारी साय 6 वाजता निपाणी तहसिलदारांसह आहार व पोलीस विभागाने पकडून त्यांच्या मुसक्या अवळल्याने तांदूळ विक्रेत्यांना आता धडकी भरली आहे.

      तहसीलदार प्रवीण कारंडे व फूड ऑफिसर अभिजीत गायकवाड,यांना खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार,मानकापूर व बोरगाव परिसरामध्ये, कर्नाटक सरकारकडून मिळालेल्या फुकट मिळणाऱ्या तांदळाचा, विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या,,लोकांना रंगेहात पकडून,, त्यांच्याकडून जप्त केलेले तांदूळ, तसेच टाटा एस ही चार चाकी गाडी, जप्त करून, सापडलेल्या तांदूळ मालाचा पंचनामा करून एफ आय आर दाखल करण्यात आले,

    निपाणी तहसीलदार कार्यालय आणि, निपाणी फूड ऑफिसर आणि सदलगा पोलीस स्टेशनच्या धडक कारवाईमुळे, रेशन धान विकणारे आणि विकत घेणारे, यांच्या उरात धडकी भरली असून, अधिक तपास करून पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे, या धडक कामगिरीमुळे, अनेकांचे धाबे दणाणले असून,, भविष्यात रेशन धान्य विकायचे कोणी धाडस करणार नाहीत असं वाटतंय,, त्या धाडसी कामामुळे सदलगा पोलीस स्टेशनचे पीएसआय भरतेश व संबंधित अधिकारी,, आणि निपाणी आहार विभाग तसेच निपाणी तहसीलदार, यांचे मानकापूर व परिसरातून कौतुक होत आहे,,,, हे गोळा केलेल्या धान्याचे गोडाऊन मानकापूरात आहे असे नागरिकांतून बोलले जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी .असे नागरिकांकडून बोलले जात आहे.

थोडे नवीन जरा जुने