Top News

अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड

शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी  ६८ तर सदस्य पदासाठी ५१२ अर्ज दाखल

सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क

शिरोळ तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची झुंबड उडाली. सरपंच पदासाठी एकुण ६८ उमेदवारी अर्ज अर्ज दाखल झाले आज अखेर सरपंच पदासाठी १७ गावातून १२७ अर्ज दाखल झाले आहेत. तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी विविध गावातून ५१२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत आतापर्यंत ८२२ सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात दाखल करण्यात आले आहेत.

तालुक्यातील राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, नवे दानवाड, अकिवाट, हेरवाड, टाकवडे, शिवनाकवाडी, लाटवाडी, अब्दुललाट, औरवाड, कनवाड, चिंचवाड, हरोली, कवठेसार, उमळवाड, संभाजीपूर या गावच्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

पहिल्या तीन दिवसात कमी प्रमाणात अर्ज दाखल झाले होते. मार्गशीर्ष गुरुवारचा मुहूर्त साधून सरपंच पदासाठी ३६ तर सदस्य पदासाठी १९४ अर्ज दाखल झाले होते. यानंतर शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी  ६८ तर सदस्य पदासाठी ५१२ अर्ज दाखल झाले.

दरम्यान निवडणूक विभागाने ऑफलाईन अर्ज भरण्यास परवानगी दिली होती याची मुदत सायंकाळी ५ : ३० वाजेपर्यंत वाढविली होती. त्यामुळे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झाली रात्री उशीरापर्यंत अर्ज दाखल करून घेण्यात आले होते. दरम्यान ५ डिसेंबर रोजी छाननी होणार असून ७ रोजी माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे.


थोडे नवीन जरा जुने