Top News

गुरुवार ८ डिसेंबर रोजी दत्त कारखान्याच्या वतीने शेतकरी मेळावा

 


सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क

श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीने गुरुवार दिनांक ८ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता कारखाना कार्यस्थळावर, दत्त मंदिर शेजारी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन श्री दत्त कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले आहे.

या मेळाव्याला हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचे हवामान आधारित शेती या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. तसेच प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी व युवा व्याख्याते वसंत हंकारे यांचेही मार्गदर्शन होणार आहे.

 तरी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी केले आहे.

थोडे नवीन जरा जुने