हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
भारताच्या स्वतंत्र लढ्यात यशवंतराव होळकरांचे फार मोठे योगदान होते. स्वातंत्र्य लढ्यातील योगदान तसेच गनिमीकावा वापरुन ब्रिटिशांना जेरीस आणले होते. तसेच त्यांनी केलेल्या लोकोपयोगी कार्याचा इतिहास तरुणांनी जाणून घेवून त्यांच्या विचारांचा वारसा सर्वांनी जपावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अजित अकिवाटे यांनी केले.
हेरवाड ( ता. शिरोळ) येथे युवकांच्या वतीने राजे यशवंतराव होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली, यावेळी अकिवाटे बोलत होते. प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी सागर वाघे, किसन वाघे, रोहित बावचे, वैभव बावचे, बंडू आरगे, रामा कोरुचे यांच्यासह युवक उपस्थित होते.
