Top News

मोठ्या शक्तीप्रदर्शनाने विमल गायकवाड यांचा अर्ज दाखल


 हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी सत्ताधारी गटातील एकता ग्रुपचे दुसर्‍या उमेदवार किशोर गायकवाड यांच्या मातोश्री विमल गायकवाड यांचा प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी अर्ज मोठ्या शक्तीप्रदर्शनाने आज शिरोळ येथे दाखल करण्यात आला.

सत्ताधारी आर. बी. पाटील यांच्या गटाकडून एकता ग्रुपला दोन उमेदवार दिले आहेत. प्रभाग क्रमांक 1 मधून सर्वसाधारण महिलासाठी काल राजकिशोर ढोणे यांच्या पत्नी मिनाक्षी ढोणे यांनी अर्ज दाखल केला. यानंतर आज किशोर गायकवाड यांच्या मातोश्री विमल गायकवाड यांचा अर्ज आज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करण्यासाठी एकता ग्रुपच्या पदाधिकार्‍यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले.

थोडे नवीन जरा जुने