हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
घोसरवाड येथे संपन्न झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. कबड्डीमध्ये लहान व मोठया गटातील मुलींनी अजिंक्यपद पटकावले.
4x 100 मीटर मोठा गट रिलेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. कु.अनुष्का दिलीप पाटील हिने मोठया गटात गोळाफेक व थाळीफेकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. मोठा गट100 मीटर धावणेमध्ये कु. विशाखा मच्छिंद्र कांबळे हिने द्वितीय क्रमांक तर 200 मीटर धावणे मोठा गटात कु. स्वराली अशोक पाटील हिनेही द्वितीय क्रमांक मिळविला.400 मीटर धावणे मोठ्या गटात कु. अनुपमा अरविंद पाटील हिने तृतीय क्रमांक पटकावला. उंच उडी मोठया गटात कु.आल्फिया लियाकत चाँदखान हिने द्वितीय क्रमांक तर लहान गटात कु. दिव्या पंकज नेर्ले हिने तृतीय क्रमांक मिळविला. तर लांब उडी मोठया गटात कु. सुमन संदीप कांबळे हिने तृतीय क्रमांक मिळविला. मुख्याध्यापक सुभाष तराळ,अध्यापक -बाबालाल बाणदार,सतिश यळगुडे,बाळू यादव अध्यापिका -गीता ढवळे,अर्चना पाटील,सरिता पाटील,जयश्री होनमाने यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. क्रीडा स्पर्धेतील या दैदिप्यमान यशाबद्दल हेरवाडमध्ये कौतुक होत आहे.
