चौथ्या दिवशी सरपंच पदासाठी ३६ तर सदस्य पदासाठी १९४ अर्ज दाखल
सुरेश कांबळे/शिवार न्यूज नेटवर्क
शिरोळ तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी सरपंच पदासाठी एकुण ३६ उमेदवारी अर्ज अर्ज दाखल झाले आज अखेर सरपंच पदासाठी १७ गावातून ५९ अर्ज दाखल झाले आहेत. तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी विविध गावातून १९४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत आतापर्यंत ३१० सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात दाखल करण्यात आले आहेत.
तालुक्यातील राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, नवे दानवाड, अकिवाट, हेरवाड, टाकवडे, शिवनाकवाडी, लाटवाडी, अब्दुललाट, औरवाड, कनवाड, चिंचवाड, हरोली, कवठेसार, उमळवाड, संभाजीपूर या गावच्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पहिल्या तीन दिवसात कमी प्रमाणात अर्ज दाखल झाले होते. आज मार्गशीर्ष गुरुवारचा मुहूर्त साधून सरपंच पदासाठी ३६ तर सदस्य पदासाठी १९४ अर्ज दाखल झाले आहेत.
दरम्यान निवडणूक विभागाने ऑफलाईन अर्ज भरण्यास परवानगी दिली असून याची मुदत उद्या सायंकाळी ५ : ३० वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे.
