Top News

बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये 10 मुलांवर मोफत शस्त्रक्रिया

  आयुष्मान भारत आरोग्य कर्नाटक योजनेंतर्गत उपचार ; नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


अजित कांबळे/ शिवार न्यूज नेटवर्क .

ऑपरेशन म्हटले की प्रत्येकाला धडके भरते. शस्त्रक्रिया आली की सर्वांना प्रश्न पडतो तो पैशांचाच. त्यानुसार गरिबांसाठी वरदान ठरलेली केंद्र व कर्नाटक सरकारची यशस्वी आयुष्यमान भारत, आरोग्य कर्नाटक योजना बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आली असून हृदयासंबंधी व्याधी असणाऱ्या रुग्णांना याचा लाभ होणार आहे. हृदयाला छिद्र असणे, छातीत वेदना असणे, बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला दिलेले रुग्ण, हृदयाच्या झडपांचे आजार असलेले रुग्ण, जन्मजात हृदयरोग असणाऱ्या गरीब रुग्णांना याचा लाभ होणार आहे.

 या योजनेंतर्गत 10 मुलांवर हृदयावरील यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर यापैकी 2 मुलांना डिस्चार्ज देण्यात आला असून उर्वरित मुलांना एक- दोन दिवसांत डिस्चार्ज देण्यात येणार आहे. आयुष्मान भारत, आरोग्य कर्नाटक ही योजना गरिबांसाठी वरदान ठरत आहे. अरिहंत हॉस्पिटलमध्ये नोव्हेंबरमध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे. दरम्यान जिल्हा आरोग्य खात्याशी समन्वय साधून अरिहंत हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यातील 350 मुलांवर टप्प्याटप्प्याने आयुष्यमान भारत, आरोग्य कर्नाटक योजनेंतर्गत हृदयावरील शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

कोणीही उपचारविना राहू नये, ही इच्छा

आयुष्यमान भारत, आरोग्य कर्नाटक योजना गरिबांसाठी वरदान आहे. पण अनेक रुग्णांना पैशांची तडजोड करताना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. परिणामी उपचाराकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे एकही रुग्ण उपचाराविना राहू नये, ही आमची इच्छा आहे. आयुष्यमान भारत, आरोग्य कर्नाटक योजनेंतर्गत गरीब रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या सदर योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित यांनी केले.


हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या योजनेचा लाभ घ्यावा

 गरीब रुग्णांवर योग्य व कमी खर्चात शस्त्रक्रिया व उपचार व्हावेत, हा एकमेव अरिहंत हॉस्पिटल सुरू करण्यामागचा उद्देश आहे. अरिहंत हॉस्पिटलमार्फत आयुष्मान भारत, आरोग्य कर्नाटक योजने अंतर्गत गरीब रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येत आहेत. याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटलचे संचालक व उद्योजक अभिनंदन पाटील यांनी केले.


ग्रामीण भागातील रुग्णांना लाभ मिळवून देऊ

अरिहंत हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या आयुष्यमान भारत, आरोग्य कर्नाटक योजनेचा ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ होणार आहे. ग्रामीण भागात असे अनेक रुग्ण आहेत की पैशांविना उपचार करून घेण्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र आता हॉस्पिटलमध्ये योजना सुरू झाल्याने गरीब रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करणे सोपे झाले आहे.निपाणी, चिकोडी भागातील हृदयासंबंधी समस्या असलेल्या रुग्णांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन युवा नेते उत्तम पाटील यांनी केले.

------------------------+++-------------

बोरगाव हुन प्रतिनिधी अजित कांबळे.

थोडे नवीन जरा जुने