Top News

लायन्स क्लब तर्फे गांधी पुतळा येथे अन्नदान छत्र सुरू

इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :

लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्यावतीने इचलकरंजी शहरातील गरजू व गरीब लोकांसाठी गांधी पुतळा येथील मंगळवार पेठ पोलीस चौकी समोर महादान अन्नदान चालू करून सामजिक बांधिलकी जोपासण्यात येत आहे.

            शहरातील गरजू व गरीब लोकांच्याकरिता ३ डिसेंबर ते १ जानेवारी पर्यंत सकाळी 11:30 ते 12:30 वा.सुमासास चपाती,भाजी,डाळ,भात,लोणचे तसेच गोड बर्फी असे एक वेळचे फूड पॅकेट मोफत वाटण्याचा उपक्रम लायन्स क्लब तर्फे सुरू केला आहे.

         सदर उपक्रमास आज शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांनी भेट देवून या उपक्रमाचे कौतुक केले.यावेळी लायन्स क्लब चे अध्यक्ष महेंद्र बालर,सचिव सुभाष तोष्णीवाल,ट्रेजरर संदीप सुतार,क्लब प्रशासक विजय राठी,महिला विंग चेअरमन कनकश्री भट्टड, प्रोजेक्ट चेअरमन श्रुतिका भंडारी,गायत्री मर्दा,सदस्य भरत भंडारी, मनोज सोमाणी,के के दमानी, लक्ष्मीकांत बांगड,स्पॉन्सर ऊर्मिलाजी चांडक व सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे उपस्थित होते.

          तरी शहरातील गरजू लोकांनी सदर अन्नदान छत्राचा लाभ घ्यावा, असे लायन्स क्लब च्या वतीने आवाहन केले जात आहे. शहरवाशीयकडून सदर उपक्रमाबद्दल लायन्स क्लब चे कौतुक होत आहे.

थोडे नवीन जरा जुने