कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने शिक्षण प्रसारक मंडळाच्या सीताबाई पटवर्धन हायस्कूल, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आणि सौ. विमलादेवी खंडेराव माने कन्या माध्यमिक विद्यालय या प्रशालांच्या माध्यमातून कुरुंदवाड शहराच्या प्रमुख मार्गावरून आज भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
या शोभायात्रेमध्ये संस्थेचे चेअरमन प्रा. शरद पराडकर , संचालक रविकिरण गायकवाड सौ. श्रद्धा कुलकर्णी , सदस्य सतीश कुलकर्णी यांच्यासह माजी नगरसेवक मा. श्री. रामभाऊ मधाळे, माजी उपनगराध्यक्ष मा. श्री. गौतम ढाले, मा. सौ. अर्चनाताई ढाले, माजी नगरसेवक मा. श्री. अनुप मधाळे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. जय कडाळे, दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. सुनील कुरुंदवाडे, श्री. धम्मपाल ढाले श्री शिशुपाल ढाले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
या शोभायात्रेत संस्थेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी -विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग होता. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा आबाल वृद्धांसह स्त्री-पुरुषांची उपस्थिती होती. यानिमित्ताने शहराच्या मध्यभागी असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
