Top News

नृसिंहवाडीत बुधवारी दत्त जन्मकाळ सोहळा... सर्व तयारी पूर्ण

नृसिंहवाडी / शिवार न्यूज नेटवर्क :

   श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या बारा वर्षाच्या तप साधनेने पावन झालेल्या व दत्त महाराजांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नृसिंहवाडी येथे बुधवार दिनांक 7 डिसेंबर रोजी मुख्य मंदिरात सायंकाळी पाच वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होत असून या सोहळ्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे गेल्या दोन वर्षाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रथमच निर्बंध मुक्त दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार असल्याने या दिवशी तीन लाखावर भाविक दत्त दर्शनाचा लाभ घेतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

      श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी येथे भक्त उद्धारासाठी मनोहर पादुकांची स्थापना केली या श्री चरण कमलाच्या दर्शनानंतर अनेक भाविकांची मनोकामना पूर्ण होते अशी श्रद्धा आणि धारणा आहे यामुळे हे क्षेत्र अत्यंत जागृत मानले जाते.

   येथील दत्त मंदिर हे पुरातन असून यावर्षी या दत्त मंदिराला 588 वर्षे पूर्ण झाले आहेत यानिमित्त यावर्षी साजऱ्या होणाऱ्या दत्त जन्मकाळ सोहळ्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे पूर्वाभिमुख मंदिर असून येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला श्री चरणाचे दर्शन अत्यंत सुलभतेने घेता येते अशी व्यवस्था मंदिर बांधकामा वेळीच करण्यात आले आहे.

   बुधवार दिनांक 7 डिसेंबर रोजी दत्त जन्म काळ सायंकाळी पाच वाजता मुख्य मंदिरात होणार आहे यावर्षीच्या दत्त जयंती उत्सवाचे मानकरी अवधूत नारायण घाटे पुजारी हे आहेत श्रींच्या जन्म काळानंतर भक्त भाविकांच्या दर्शनासाठी श्रींचा पाळणा त्यांचे घरी ठेवण्यात येणार आहे.

     या निमित्त घाटे पुजारी वाडा येथे आकर्षक मंडप विद्युत रोषणाई रंगरंगोटी करण्यात आली आहे.

  29 नोव्हेंबर पासून दत्त जन्म काळ सोहळ्यास प्रारंभ झाला असून या निमित्त दत्त मंदिरात विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक गायन वादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

  यावर्षीची दत्त जयंतीची गर्दी लक्षात घेता दत्त देव संस्थांमार्फत विस्तीर्ण दक्षिण उत्तर घाटावर भव्य मंडप तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या पाच दर्शन रांगा बॅरॅकेट्स पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्राथमिक आरोग्य सुविधा महाप्रसाद क्लोज सर्किट टीव्ही दर्शन व्यवस्था आधी सुविधा पुरविण्यात आले आहेत.

     दत्त जन्मकाळ सोहळ्यानिमित्त बुधवारी पहाटे पाच वाजता काकड आरती सकाळी आठ नंतर भक्त भाविकांचे पंचामृत अभिषेक दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या मुख्य चरण कमलांची महापूजा यानंतर दुपारी तीन ते चार पावमान पठण व ठीक चार वाजता कीर्तन होऊन मंदिरातील घड्याळाप्रमाणे सायंकाळी पाच वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे.

    दत्त जन्मकाळ सोहळ्यानिमित्त दत्त देव संस्थान मार्फत संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता व रंगरंगोटी करण्यात आली आहे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे त्याचबरोबर मंदिरासमोरील वाढीव प्लॅटफॉर्म वर मंडप शामियाना उभारण्यात आला आहे या जन्मकाळ सोहळ्याचे सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती दत्तदेव संस्थांचे अध्यक्ष सदाशिव पुजारी सचिव संजय पुजारी यांनी दिली

    दत्त जन्म काळ यात्रेची गर्दी लक्षात घेता ग्रामपंचायत नृसिं वाडीने यात्रेचे नेटके नियोजन केले आहे यानिमित्त मंदिर मार्गावर सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे त्याचबरोबर व्यापारी दुकानाचे स्टॉल यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे कुरुंदवाड एसटी आगारामार्फत जादा एसटी बस गाड्यांची व्यवस्था कोल्हापूर सांगली इचलकरंजी कागल आधी ठिकाणी केली आहे.

थोडे नवीन जरा जुने