इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :
गेली ६२ वर्षे विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारा लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी ने समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये आपल्या समाजसेवेचा ठसा उमटवून परिसरातील जनतेच्या मनामध्ये एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे . समाजातील प्रत्येक गरजवंत घटक नजरेसमोर ठेवून सेवाकार्याचे आयोजन करतो त्याचाच एक भाग म्हणून लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्यावतीने इचलकरंजी शहरातील गोरगरीब व गरजू लोकांसाठी गांधी पुतळा येथील मंगळवार पेठ पोलीस चौकी समोर महादान अन्नदान चालू केले आहे.
शहरातील गरीब व गरजू लोकांच्याकरिता 3/12/22 ते 7/1/23 रोजीपर्यंत सकाळी 11:30 ते 12:30 वा.सुमासास चपाती,भाजी,डाळ,भात,लोणचे तसेच गोड बर्फी असे एक वेळचे फूड पॅकेट मोफत वाटण्याचा उपक्रम लायन्स क्लब तर्फे सुरू केला आहे.
सदर उपक्रमास आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य मा. मदनरावजी कारंडे साहेब यांनी भेट दिली.महाअन्नदान या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले .यावेळी लायन्स क्लब चे अध्यक्ष महेंद्र बालर,सचिव सुभाष तोष्णीवाल,ट्रेजरर संदीप सुतार,क्लब प्रशासक विजय राठी,महिला विंग चेअरमन कनकश्री भट्टड, लेडीज को ओरडीनेटर कांता बालर,प्रोजेक्ट चेअरमन श्रुतिका भंडारी,गायत्री मर्दा,सदस्य मनोज सोमाणी,के के दमानी,द्वारकादिश बोरा,नंदकुमार बांगड,समित काब्रा,मिलींद बिरादार, अभिजित सातपुते, श्रद्धा सातपुते, अमित पोद्दार,संगीता सारडा, मोना पाटणी,आदी उपस्थित होते.
तरी शहरातील गरजू लोकांनी सदर अन्नदान छत्राचा लाभ घ्यावा असे लायन्स क्लब च्या वतीने आवाहन केले जात आहे.*सदर उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून लायन्स क्लब चे कौतुक होत आहे.
