सांगली शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी शाहीन मुल्ला यांची निवड
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझर्स संघटनेच्या हातकणंगले लोकसभा मतदार संघ महिला आघाडीच्या अध्यक्षपदी बेबी माणिक तांबोळी ( कोथळी ) तसेच ओबीसी ऑर्गनायझर्स संघटनेच्या सांगली शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी शाहीन निजामुद्दीन मुल्ला
(सांगली) यांची निवड करण्यात आली, दरम्यान, नूतन पदाधिकाऱ्याना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. येथील ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेच्या कार्यालयात बैठक झाली, संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एम एस गवंडी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते, यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत मुस्लिम समाजाचे सरपंच, सदस्य निवडून आल्याबद्दल तसेच पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल सद्दाम फकीर (टाकवडे) तसेच पीएचडी केल्याबद्दल शिरोळचे श्री देशमुख यांचा अभिनंदन ठराव बैठकीत करण्यात आला,
यावेळी मुस्लिम ओबीसी संघटनेचे राज्य सचिव फिरोजभाई आतार, जिल्हा अध्यक्ष जहांगीर हजरत , मुस्लिम समाजाचे तालुका नेते दिलीप कलावंत, जिल्हा सरचिटणीस काशीम नदाफ ,हाजी शहंशाह उर्फ आयुब मुल्ला , श्री मुबारक , फरीद जमादार तालुकाध्यक्ष ए जी मुल्ला उपस्थित होते.
