हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत एकहाती सत्ता प्राप्त केलेल्या बहुजन ग्रामविकास आघाडीचे नवनिर्वाचित शिलेदार पुढच्या वर्षी म्हणजेच १ जानेवारी २०२३ नंतर आपला पदभार स्विकारणार आहेत. वर्षारंभाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना ही संधी प्राप्त झाली असून नव्या जोमाने ते हेरवाडची धुरा सांभाळतील अशी आशा ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे.
गटनेते दिलीप पाटील व वसंतराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली बहूजन विकास आघाडीच्या माध्यमातून हेरवाड ग्रामपंचायती मध्ये परिवर्तन घडवून नव्या चेहर्यांना काम करण्याची संधी दिली आहे. सध्या नूतन पदाधिकाऱ्यांचा गावात विविध ठिकाणी सत्कार सुरु असून नुकतेच त्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. मात्र अद्याप पदभार स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी यांचा आदेश प्राप्त झाला नाही, त्यामुळे हा आदेश येण्यासाठी तिन ते चार दिवसाचा कालावधी असल्याचे समजते, त्यानंतर नोटिसा काढून मासिक मिटिंग घेवून पदभार स्विकारला जाणार आहे.
त्यामुळे नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच हे नूतन पदाधिकारी आपला पदभार स्वीकारणार असल्याचे समजते.
