कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
गेल्या महिनाभरापासून ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामात व्यस्थ असलेल्या प्रशासनाला अंधारात ठेवून महिनाभरापासून नदीपलीकडील सात गावात माती उपसा सुरु असल्याने हा उपसा कायदेशीर आहे की बेकायदेशीररित्या सुरु आहे हे पाहणे गरजेचे आहे. ऐन निवडणूकीमध्ये मोठ्या प्रणाणात डंपरव्दारे ही माती इतर जिल्हयात जात असल्याने यावर अंकुश कोण ठेवणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
उत्खनन करताना नियमापेक्षा खोल खुदाई करू नये, असा शासकीय नियम असतानादेखील या परिसरात खोल खोदकाम केल्याचे वारंवार आढळत असते. तसेच वाहनांची गावातून सतत वाहतूक सुरू असल्याने उडणाऱ्या धुरळ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अवजड वाहतुकीमुळे गावातील, तसेच विभागातील रस्त्यांची पूर्णत: वाताहत झाली होत असल्याने या माती उपशाची पाहणी प्रशासनाने कररावी अशी मागणी केली जात आहे.
