Top News

आज अर्जांची छाननी ; उमेदवारांची धाकधुक वाढली


सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यातील १७ ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. १७ गावातून सरपंच पदासाठी १२७ तर सदस्य पदासाठी विक्रमी ५२२ अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची छाननी आज होणार असून कोणाचा अर्ज छानणीतून बाहेर पडणार ? याची भिती उमेदवारांना लागून राहिली आहे. मात्र, ऑनलाईन अर्ज भरताना राहिलेल्या त्रुटी, अपुरी कागदपत्रे भरले ल्या उमेदवारांचे देव मात्र आज पाण्यात असून काहीही करून ही निवडणूक लढवायचीच असा इरादा अनेक उमेदवारांनी केला आहे.

तालुक्यातील राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, नवे दानवाड, अकिवाट, हेरवाड, टाकवडे, शिवनाकवाडी, लाटवाडी, अब्दुललाट, औरवाड, कनवाड, चिंचवाड, हरोली, कवठेसार, उमळवाड, संभाजीपूर या गावच्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूक सुरु आहे. आज दिवसभरात छाननीचे काम सुरु राहणार असून ७ डिसेंबर हा माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे छानणीनंतरच आड येणारी उमेदवारी मागे घेण्यासाठी बैठकांवर बैठका घेतल्या जाणार आहेत.

थोडे नवीन जरा जुने