Top News

उमेदवारांनी परस्पर पॅनेल जाहीर करून प्रचार सुरु केल्याने पॅनेल धोक्यात?

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क

      ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच पॅनेलच्या घडामोडी सुरू होत्या.चर्चा, बैठकांना ऊत आला होता. सोमवार दि. 5 डिसेंबर 2022 रोजी उमेदवारांच्या अर्जांची छाननी होणार आहे तर बुधवार दि. 7 डिसेंबर 2022 रोजी उमेदवार माघारीची मुदत आहे. त्यानंतरच पॅनेलचे चित्र स्पष्ट होणार आहे.पॅनेलची रचना कशी करायची?पॅनेलमध्ये कोणाचा समावेश करायचा? कोणाचा पत्ता कट करायचा हे ठरेल. पण त्यापूर्वीच उमेदवारांनी स्वयंघोषित आपणच पॅनेलचे उमेदवार आहे असे जाहीर करून प्रचारास सुरुवात केली आहे. यामुळे पॅनेल तयार करताना प्रमुखांची डोकेदुखी होणार हे मात्र निश्चित.

थोडे नवीन जरा जुने