अकिवाट / शिवार न्यूज नेटवर्क :
अकिवाट मधील मतदार सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळले असून येत्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये निश्चित सत्तांतर होऊन परिवर्तन होणार आहे. ग्रामविकास परिवर्तन आघाडी निश्चित विजय होईल, असे प्रतिपादन गटनेते इकबाल बैरागादार व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे बाळासाहेब उमाजी हे आघाडीच्या प्रचार फेरी दरम्यान केले.
दरम्यान ग्रामविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या प्रचार फिरायला सर्वच प्रभागातून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. महिला मतदार आतून उदंड प्रतिसाद मिळत आहे तलावातील झाडे तोडून गाळ काढणे यामध्ये गैरव्यवहार झाला आहे. तसेच महापुराच्या काळामध्ये आपल्या मर्जीतील लोकांनाच अनुदान मिळवून दिले आहे दोन दोन महिने दिवाबत्तीची सोय तक्रार करूनही केली जात नाही सत्ताधारी आघाडीने अकिवाट मतदारांचा विश्वासघात केला असून अनेक ठिकाणी गैरव्यवहार होत असल्याचा घणाघातही करीत आहेत. आज झालेल्या प्रचार फेऱ्यांमध्ये जवाहर संचालक सजय कोथळी, आप्पासो बडबडे, बाबासाहेब उमाजे, बाळासाहेब नाईक, सरपंच पदाचे उमेदवार सौ वंदना सुहास पाटील, सौ प्रमिला चौगुले ताजुद्दीन तहसीलदार जहांगीर तहसीलदार मिस्त्री विद्यासागर रायनाडे गळतगे बंटी रायनाडे विश्वास कांबळे किरण कांबळे आदी मान्यवर सामील झाले आहेत.
