राजर्षी शाहू आघाडीची प्रचारात मुसंडी
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
विकास कामांच्या जोरावर पुन्हा निवडणूक रिंगणात उतरुन गटनेते आर.बी.पाटील व माजी सरपंच सुरगोंडा पाटील यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीने तोच जोश.. तीच ताकद.. कायम ठेवल्याने या आघाडीने प्रचारात गेल्या दोन दिवसात मुसंडी मारली आहे.
सामाजिक कार्यकर्ते जीवन कांबळे यांच्या पत्नी तृप्ती कांबळे या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सरपंच पदाची उमेदवारी दिली आहे. ग्रामपंचात स्थापनेपासून गावातील बौध समाजाला आजपर्यंत सरपंच पदाची संधी मिळाली नाही, गेल्या अनेक दशकापासून या निवडणूकीच्या निमित्ताने ही संधी चालून आली आहे. त्यामुळे गावातूनही सरपंच पदाच्या उमेदवार तृप्ती कांबळे यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे. विकास कामांच्या जोराबरोबर गावातील अनेक प्रश्नी मार्गी लावून विधवा प्रथा बंदीचा ठराव करुन संपूर्ण देशात गांवचे नांव लौकीक झाले आहे. हेच मुद्दे घेवून आगामी काळातील विकासाचे व्हिजन घेवून ही निवडणूक लढविली जात आहे. गावातील प्रत्येक प्रभागातील उमेदवरांना मोठा प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे राजर्षि शाहू विकास आघाडीचा विजय निश्चित होणार असल्याचे मत गटनेते आर.बी.पाटील यांनी व्यक्त केले आहे.

