Top News

महापुरुषाबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ कुरुंदवाड कडकडीत बंद

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

  महापुरुषाबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व मंत्री चंद्रकांत पाटील यांना पदावरून हटवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी येथील आंबेडकरवादी पुरोगामी पक्ष संघटनेंंच्यावतीने शहर बंदची हाक दिली होती. या बंदला अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला. 

    दरम्यान विविध संघटनेंंच्यावतीने शहरातील प्रमुख मार्गावरून निषेध मोर्चा काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मंत्री पाटील व राज्यपाल कोश्यारी यांच्या तैलचित्राला जोडे मारून दहन करण्यात आले. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांना निवेदन देण्यात आले .

    यावेळी रामदास मधाळे, माजी नगरसेवक अनुप मधाळे, शाहीर आवळे, धम्मपाल ढाले, शंकर कांबळे, सुनील कुरुंदवाडे आदींची भाषणे झाली.  आंदोलनात गौतम ढाले, संजय कांबळे, संजय कुरुंदवाडे, राजू आवळे, रघु नाईक, महावीर आवळे, सुनील जुगळे, हर्षद बागवान, सतीश भंडारे या मान्यवरासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




थोडे नवीन जरा जुने