Top News

नोकरी लावण्याचे अमिष दाखवून २७ जणांची ४३ लाखाची फसवणूक

 कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

   रेल्वे, आयकर व भारतीय सैन्य दलात नोकरी लावतो असे सांगून खोटी नियुक्तीपत्रे व ओळखपत्रे देऊन 27 जणांची एक कोटी 43 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आनंदा गणपती करडे वय 45 रा. कुरुंदवाड यांनी फिर्याद दिली आहे.

    पोलिसांंतून मिळालेली अधिक माहिती अशी की, 4/4/ 2021 ते 22/7/2022 या काळात रेल्वे खात्यात आयकर विभागात व भारतीय सैन्य दलात नोकरी लावतो असे सांगून क्रांतीकुमार पाटील रा. फुलेवाडी, मोहम्मद कामील अब्दुल गफार वय 41 सध्या कुर्ला मुंबई, मुळगाव प्लॉट नंबर 41 नुरी मशीद जवळ, जाफर नगर नागपूर, अनिसखान गुलाम रसूलखान काटोल रोड नागपूर, रुद्रप्रताप भानुप्रताप सिंग कोलकत्ता, सुबोध कुमार कोलकत्ता यांनी 27 जणांना बोगस नियुक्तीपत्रे ओळखपत्रे देऊन 1 कोटी 43 लाखाची फसवणूक केली आहे. या फसवणूकीची फिर्याद आनंदा गणपती करडे यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली असून या पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पुलिस उपनिरीक्षक अमित पाटील करीत आहेत.

थोडे नवीन जरा जुने