शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा फटका मुंबईसह महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे आज ५ वाजण्याच्या सुमारास शिरोळ तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. ऐन हिवाळ्यामध्ये पाऊस पडल्याने शिरोळ तालुक्यातील जनतेची मात्र तारांबळ उडाली.
११ ते १४ डिसेंबरदरम्यान राज्यात ठिकठिकाणी हवामानात बदल होतील आणि पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वाढलेले किमान तापमान व ढगाळ वातावरण पुढील ४-५ दिवस तसेच राहील, असे हवामान तज्ञांनी सांगितले आहे. दरम्यान, सध्या उसाचा हंगाम सुरू असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या तोडी चालू आहेत. दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे शेतातील ऊस पडून राहणार असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
