Top News

हेरवाड ः माघारीसाठी 20 नको 25 हजार द्या... म्हणणारा स्वयंघोषित पुढारी कोण ?

हेरवाड/शिवार न्यूज नेटवर्क-

सध्या हेरवाड ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत, मात्र, गोर गरिब आणि हातावरचे पोट असणार्‍या कष्टकरी महिलांना विविध लाभाचे तसेच पैशाचे अमिष दाखवून महिलांच्या भावनेशी खेळणार्‍या वस्त्रनगरीतील तो स्वयंघोषीत पुढारी मात्र हेरवाडच्या निवडणूकीत आपला खिसा गरम करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

 निवडणूकीचे वातावरण तापले असताना एका महिलेला उभे करुन निवडणूक लढविण्याचा चंग बांधण्यात आला. मात्र, एका गल्लीतीलच दुसरी शिट लावून त्या बहाद्दराने तर मोठ्या मंडळात मोठा वाद निर्माण केला, अखेर माघारीच्या अखेरच्या दिवशी अपक्ष उमेदवारी माघारीसाठी विनवन्या होवू लागल्या, मात्र, पैशाची लालुची लागलेल्या त्या स्वयंघोषीत पुढार्‍याने संबंधित महिलेच्या माध्यमातून सकाळी सुरु असलेली चर्चा 3 वाजता संपवून चक्क 25 हजाराची मागणी केली, सगळं ठरल्या प्रमाणे झालं. संबंधित महिलेला घेवून त्याने चक्क तहसिल कार्यालय गाठले, मात्र, वेळेला कोण थांबवणार ? माघारीची वेळ संपल्यावर त्या स्वयंघोषीत पुढार्‍याला पश्चाताप झाला. आणि आता, महिलांची माथी भडकावून गावात प्रचार यंत्रणा राबवून आणखी कुठे पोळी भाजता येते काय, याची वाट पाहत असल्याची चर्चा गावात सुरु आहे. 


थोडे नवीन जरा जुने