Top News

तो आला ... हरला पण जनतेचं मन जिंकला ..!



हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

           कोण आहे हा? तर हा आहे नवखा अवघ्या 22 व्या वर्षातला तरुण डिप्लोमाधारक उत्कर्ष सुभाष तराळ.वॉर्ड क्र.4 मध्ये ग्रामपंचायत सदस्यपदी उमेदवार म्हणून उभा होता. घरी कोणताही राजकीय वारसा नव्हता ना कोणता बडेजाव? सर्वसामान्य कुटुंबातील एक तरुण.जो उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीपासूनच सर्वांच्या संपर्कात होता. सर्वांच्यापुढे नम्रतेने मतदानासाठी विनवणी करीत होता.ना कोणत्याही पॅनेलमध्ये नसताना अपक्ष म्हणून जी टक्कर दिली. ती विलक्षण व लक्षणीय म्हणावी लागेल पॅनेलमधील विजयी उमेदवाराला 379, दुसऱ्या पॅनेलमधील उमेदवाराला 263, तर उत्कर्ष तराळ याला 215 मते मिळाली. यावरुन आकडेवारी वरून हेरवाड गावात एकच चर्चा सुरू आहे की तो आला, हरला पण जनतेच मन जिंकला.

थोडे नवीन जरा जुने