Top News

एकजुट होवून लढा देवू : हेरवाड येथील अतिक्रमण धारकांच्या बैठकीत निर्णय

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

उच्च न्यायालयाने गायरानातील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले दिल्याने जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेत कारवाईची तयारी सुरु केली असल्याने हेरवाड येथील अतिक्रमणधारकांची बैठक संपन्न झाली या बैठकीत सर्वांनी एकजुट होवून या विरोधात लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी बोलताना सरपंच सुरगोंडा पाटील म्हणाले, अतिक्रमणाबाबत कायदे सल्लागार, सामिजिल कार्यकर्ते सर्वांनाच घेवून आम्ही लढा देवू. त्यामुळे अतिक्रमण धारकांनी घाबरुन न जाता सर्वांनी मिळून एकत्र येर्‍याचे आवाहन केले.

सदरचे नागरिक हे पिढयान पिढ्या राहत आहेत त्यामुळे ते अतिक्रमण धारक असू शकत नाहीत. न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासन काम करत आहे. त्यामुळे कोणीही घाबरून न जाता सर्वांनी मिळून हा लढा लढूया. अतिक्रमण धारकांच्या घराच्या खापरीला सुद्धा हात लावू देणार नसल्याचा इशारा दिला. 

यावेळी अँड अनिरुद्ध कांबळे म्हणाले, हद्दवाढ करण्याची कार्यवाही प्रशासनाने वेळीत केली नाही. गावामध्ये घरे बांधणेसाठी जागा नसल्याने सामान्य माणसांनी आयुष्याची पुंजी साठवून गायरानातील मोकळ्या जागेवर छोटे घरे बांधून संसार करणेचा प्रयत्न केला आहे. तसेच महापुरामुळे अनेक लोक माळभागात येवून राहिले आहेत. यासाठी राज्यशासनही प्रयत्न करीत आहे. अन्न, वस्त्र, निवारा देणे हे शासनाचे काम आहे. त्यामुळे सर्वांनी घाबरुन न जाता सर्वांनी एकत्र येवू आणि विजय हा आमचा निश्चित असल्याचे सांगितले. 

यावेळी अर्जुन जाधव, सुकुमार पाटील, आप्पा बंडगर, पुरग्रस्त समितीचे अध्यक्ष पांडूरंग गायकवाड, सुरेश सासणे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी अतिक्रमण बचाव  संघर्ष कृती समितीची घोषणा करण्यात आली.

यावेळी अमोल कांबळे, संजय पुजारी, मच्छिंद्र कांबळे, चंद्रकांत मस्के, कृष्णा पुजारी, गोटू तेरवाडे, अजित अकिवाटे, रोहित कांबळे, अशोक बावचे, मनोहर कांबळे, शानाबाई जाधव, कलगोंड पाटील यांच्यासह माळ भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने