राजापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
राजापूर (ता.शिरोळ) येथे स्वयंमसिद्धी गारमेंट व महालक्ष्मी स्टेशनरिचा शुभारंभ आज गुरुवारी सकाळी ११ वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती निमंत्रक सविता पाटील यांनी दिली.
महिलांच्या हाताला काम मिळून महिलाही स्वावलंबी बनल्या पाहिजेत आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्वयंमसिद्धी गारमेंट व महालक्ष्मी स्टेशनरिचा शुभारंभ करण्यात येत असल्याची माहिती सविता पाटील यांनी दिली.
यावेळी पंचायत समिती शिरोळच्या तालुका अभियान व्यवस्थापक स्मिता सम्यक, प्रभाग समन्वयक निलेश डवरी, राजापूरचे माजी सरपंच दानू पाटील, सरपंच सविता संजय पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
