जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड ग्रामस्थांचे श्रद्धास्थान ग्रामदैवत संतुबाई मंदिराचा ब वर्गामध्ये समावेश झाला असून मंदिर परिसराच्या विकासासाठी रुपये दोन कोटीचा निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे, लवकरच संतुबाई मंदिर परिसर विकासासाठी भरीव प्रमाणात निधी मंजूर होईल अशी माहिती माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे,
हेरवाड येथील संतुबाई मंदिर हे गावातील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते, यात्रेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते त्याचबरोबर या मंदिराला हेरवाड ग्रामस्थांसह परिसरातील अनेक भाविक भेट देत असतात ग्रामदैवत संतुबाईच्या दर्शनाला परिसरातून हजारो भावीक येत असतात या मंदिर परिसराचा विकास व्हावा अशी भाविकांची व ग्रामस्थांची मागील अनेक वर्षापासूनची मागणी होती, सदर मंदिराचा ब वर्गामध्ये समावेश व्हावा यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नाला यश येऊन सदर मंदिराचा ब वर्गामध्ये समावेश झालेला आहे, या मंदिर परिसराच्या विकासासाठी दोन कोटी रुपये चा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला असून संतुबाई मंदिर परिसराच्या विकासासाठी निधी मिळण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे, मंदिर ब वर्गात समावेश झाले असल्यामुळे संतुबाई मंदिर आणि मंदिर परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे, संतुबाई मंदिराचा ब वर्गात समावेश झाल्यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे,
या कामी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
.jpg)