Top News

मागचं दिल्याशिवाय आणि पुढचं जाहीर केल्याशिवाय उसाला हात लावून देऊ नका : धनाजी चुडमुंगे

 सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

केंद्र सरकार ज्या प्रकारे उसाच्या हंगामाच्या अगोदर frp किती हे जाहीर करते त्याच प्रकारे राज्य स्तरावर सुद्धा मागच्या हंगामात प्रत्येक साखर कारखान्याला साखर आणि उप पदार्थ विक्रीतून किती महसुली उत्पन्न मिळाले याचा हिशोब करून त्या उत्पन्नातील 70% वाटा शेतकऱ्यांना द्यावा म्हणून rsf जाहीर करते पण कारखान्याकडून हिशोबच दिले जात नसल्याने शेतकऱ्यांना frp देऊन गप्प बसवले जात आहे. यावर्षी साखर कारखान्यांना मोठा फायदा झाला आहे त्या फायद्यातील वाटा मिळाल्याशिवाय यावर्षी उसाला हात लावून देऊ नका असे आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी टाकळी येथील ऊस उत्पादकांच्या बैठकीत केले.

टाकळी येथील आंदोलन अंकुश चे तालुका प्रमुख श्री दिपक पाटील यांच्या पुढाकाराने हनुमान मंदिरात बैठकीचे आयोजन केले होते त्यात धनाजी चुडमुंगे पुढे म्हणाले की दर चार वर्षांनी साखर धंद्यात तेजीचा काळ येतो 2017 मध्ये कारखान्यांनी frp अधिक 400 ते 500 रुपये दिले होते त्याच प्रकारची तेजी यावर्षी राहिली आहे म्हणून शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घ्यायची आवश्यकता असून जर शेतकऱ्यांनी थोडं थांबायचं ठरवलं तर frp सोडून 400 ते 500 रुपये मागच्या उसाला जादा मिळू शकतात कारण कारखान्यांना इतका मोठा फायदा मागच्या वर्षभरात झालेला आहे.

स्वागत व प्रास्ताविक राजू पाटील(कोडांई) यांनी केले तर आंदोलन अंकुश ने मागच्या हंगामात घोडावत खांडसरी व दत्त इंडिया सांगली यांना जाहीर केलेल्या दरापेक्षा जादा दर देण्यास भाग पाडल्याचे सांगून शेतकऱ्यांनी यावर्षी साथ दिल्यास मागच्या हंगामाचे अजून 500 रुपये मिळवून दिले जातील असे युवा कार्यकर्ता कृष्णा गावडे याने सांगितले या बैठकीस बाळासो पाटील सचिन पाटील, अमोल शिरहट्टि, सुदीप पाटील,अरिहंत शिरहट्टि,सुधीर पाटील विनायक पाटील, संतोष मिरजे, काकासो पाटील,विद्याधर पाटील,पायगोंडा पाटील,तुकाराम पाटील इत्यादी उपस्थित होते. 

गुरुदत्त कारखाना 15 तारखेला सुरु होणार आहे पण या कारखान्याने गत हंगामातील ऊसास अजून 500 रुपये द्यावेत व चालूची frp किती हे जाहीर करावे आणि मगच कारखाना सुरु करावा अशी मागणी धनाजी चुडमुंगे यांनी केली व मागचं न देता हा कारखाना सुरु केल्यास 16 तारखेला पुन्हा टाकळीच्या चौकात सभा घेऊन 17 तारखेला कारखाना बंद पाडला जाईल असा इशारा देऊन नफ्यातील वाटा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे तो त्यांचा हक्क आहे आणि आंदोलन अंकुश तुमच्या हक्काची लढाई करेल तुम्ही फक्त साथ द्या असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले.

थोडे नवीन जरा जुने