Top News

हेरवाडमध्ये ट्रॅक्टर शिरला थेट ओढ्यात ...४ फूट पाण्यातून धोकादायक वाहतूक पडली महागात


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड सह परिसरात पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे हेरवाड - घोसरवाड मार्ग पाण्याखाली गेला आहे. या मार्गावर सुमारे ४ ते ५ फूट पाणी आले असताना देखील या मार्गावरून धोकादायक वाहतूक सुरू होती. मागून येणाऱ्या मोटरसायकलला साईड देताना ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्यानंतर ट्रॅक्टर थेट ओढ्यात शिरला, चालकांने प्रसंगावधान राखून बुडणाऱ्या ट्रॅक्टरीतून उडी मारून आपला जीव वाचविला. ही घटना गुरुवारी रात्री १० : ३० वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, हेरवाड सह परिसरात सायंकाळी पाच वाजल्यापासून ढगफुटी सदृष्य पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे हेरवाड - घोसरवाड मार्ग रात्रीच्या सुमारास पाण्याखाली गेला आहे या मार्गावर सुमारे ४ ते ५ फूट पाणी आले असून मागून येणाऱ्या मोटरसायकलला साईड देताना ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर थेट ओढ्यात शिरला, चालकांने प्रसंगावधान राखून बुडणाऱ्या ट्रॅक्टरीतून उडी मारून आपला जीव वाचला. अखेर माजी ग्रामपंचायत सदस्य जयगोंड पाटील व त्यांच्या साथीदारांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने सदरचा बुडलेला ट्रॅक्टर बाहेर काढला.

प्रशासनाचा हलगर्जीपणा...!

वारंवार जेव्हा ढगफुटी सदृश्य पाऊस होतो, तेव्हा हेरवाड - घोसरवाड मार्गावर पावसाचे पाणी साचते. सुमारे चार ते पाच फुटापर्यंत पाण्याची पातळी या मार्गावर असल्याने वाहनधारकांची मोठी तारांबळ उडते' संबंधित प्रशासनाच्या वतीने या मार्गालगत असणाऱ्या चरीतील गाळ व झुडपे काढून पाण्याचा मार्ग मोकळा करण्याकडे वारंवार दुर्लक्ष केले जाते. याचा फटका या परिसरातील ग्रामस्थांसह वाहनधारकांना सोसावा लागतो. इतकेच नव्हे तर या मार्गावर पाणी येऊन सुद्धा हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला जात नाही, या पाण्यात अपघात होऊन एकाचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

थोडे नवीन जरा जुने