Top News

ढगफूटी सदृष्य पावसामुळे हेरवाड - घोसरवाड मार्ग पाण्याखाली

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड सह परिसरात पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे हेरवाड - घोसरवाड मार्ग पाण्याखाली गेला आहे. या मार्गावर सुमारे ४ ते ५ फूट पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. त्यामुळे घोसरवाड कडे जाताना वाहनधारकांनी पाचवा मैल मार्गाचा वापर करावा.

हेरवाड सह परिसरात सायंकाळी पाच वाजल्यापासून ढगफुटी सदृष्य पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे गावातील रस्ते तुडुंब भरले होते. याचबरोबर हेरवाड - घोसरवाड मार्गही रात्रीच्या सुमारास पाण्याखाली गेला आहे. या मार्गावर सुमारे ४ ते ५ फूट पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.



थोडे नवीन जरा जुने