इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील शंकरराव जाधव विद्या मंदिरमध्ये मुलांची डोळे तपासणी लायन्स क्लबच्या वतीने हेल्दी स्कूल उपक्रमांतर्गत मोफत मुलांची डोळे तपासणी करण्यात आली.या आरोग्य तपासणी शिबीरात प्रसिद्ध डोळे तज्ञ डॉ.प्रथमेश यादव यांनी 100 मुलांची डोळे तपासणी करत औषधोपचार केले.तसेच मुलांच्या आरोग्याची घ्यावयाची काळजी याविषयी मौलिक मार्गदर्शन केले.
इचलकरंजी लायन्स क्लबच्या वतीने विविध सामाजिक , आरोग्य विषयक सातत्याने उपक्रम राबवण्यात येतात. त्याचाच भाग म्हणून मुलांची डोळे तपासणी करण्यात आली या वेळी इचलकरंजी लायन्स क्लबच् चे अध्यक्ष महेंद्र बालर , सेक्रेटरी सुभाष तोष्णीवाल, श्री कृष्णा भराडिया यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गीता पाटील मॅडम ,श्री सचिन वारे सर ,सौ लिमकर मॅडम ,सौ माळी मॅडम ,सौ माणगावे मॅडम शिक्षक पालक , विद्यार्थी उपस्थित होते.
