हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
युवक आघाडी मंडळ, गांधी चौक, हेरवाड येथील मंडळाच्या देवीची आरती जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाली. तसेच मंडळाच्या वतीने आयोजित महाप्रसादाचे वाटप ही राहूल आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी माजी ता.पं.स. सभापती महेश पाटील, मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील, वैभव पाटील, महेश पाटील, सुकुमार पाटील, बाळासो पाटील यांच्यासह धनश्री पतसंस्थेचे सर्व संचालक, हेरवाड विकास सेवा संस्थेचे सर्व संचालक, काडसिद्धेश्वर दूध संस्थेचे सर्व संचालक, मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

