Top News

बिपीन लंबे नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मानित

 


दानोळी/ शिवार न्यूज नेटवर्क :

      दानोळी हायस्कूल दानोळी येथील बिपीन शंकर लंबे रोटरी क्लब आॅफ सांगली च्या वतीने नेशन बिल्डर अवाॅर्डने सन्मानित करण्यात आले. 

  शैक्षणिक कार्यात भरीव योगदान देऊन भावी पिढी घडविण्याचे काम करणार्या शिक्षकांना रोटरी क्लब आॅफ सांगली मार्फत दिला जाणारा सन्मानाचा नेशन बिल्डर अवाॅर्ड अर्थात आदर्श शिक्षक पुरस्कार यंदा दानोळी हायस्कूलच्या गणित शिक्षक बिपीन शंकर लंबे यांना देण्यात आला. सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात त्यांच्या कुटुंबीयांसमवेत कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लंबे सरांना शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व शिल्ड देवून गौरविण्यात आले. यावेळी रोटरीचे किशोर लुल्ला, डाॅ. सुभाष जोशी, राजेंद्र लंबे, धर्मेद्र खिलारे, विलास सुतार यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. 

    या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली असून हा सन्मान फक्त माझा नसून सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ, जयसिंगपूर व आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच माझे विद्यार्थी यांचा आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात फक्त एक व्यक्ती सहकारी बांधवाच्या सहकार्याशिवाय काहीच शक्य नाही. या पुरस्कारासाठी आमचे आधारस्तंभ संस्थेचे संचालक, लोकल कमिटी चेअरमन राजकुमार पाराज पाटील दादा यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका सौ. वांजुळे मॅडम यांनी सत्कार केला.

थोडे नवीन जरा जुने