हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क
सध्या हेरवाड गावामध्ये सलगरे रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, रस्ता कामाच्या पार्श्वभूमीवर हेरवाड मधील प्रमुख मार्गालगत असणाऱ्या अनेक मिळकत धारकांना नोटीसा काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे अतिक्रमण काढून रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. रस्त्याच्या कामानंतर विद्युत पोल उभारण्याचे काम होणार आहे, मात्र हे विद्युत पोल रस्त्यालगत असणाऱ्या मिळकत धारकांच्या घरालगत बसवण्यात येणार असल्याने याचा धोका येथील मिळकत धारकांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विद्युत केबल एअरबंच किंवा अंडरग्राउंड डबल रन करून बसवण्यात याव्यात व सदरचा धोका टाळावा, अशी मागणी हेरवाड ग्रामस्थांतून होत आहे.
सध्या सलगरे रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून रस्त्या लगत असणाऱ्या हेरवाड हद्दीतील अनेक मिळकत धारकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. सदरचे काम हे दिवाळीनंतर सुरू करण्यात येणार असल्याचे समजते. त्यानंतर अतिक्रमण काढून रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. रस्ता कामात काढण्यात येणारे पोल हे संबंधित मिळकत धारकांच्या घरालगतच बसविण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे या विद्युत तारांचा धोका ग्रामस्थांना होणार आहे. त्यामुळे या विद्युत केबल एअरबंच किंवा अंडरग्राउंड डबल रन करून बसवून सदरचा धोका टाळावा, अशी मागणी या परिसरातील होत आहे.
