आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आदेश
दानोळी / शिवार न्यूज नेटवर्क :
दानोळी येथील कु. नम्रता कलगोंडा कटारे या नववीमध्ये शिकणाऱ्या मुलीने शौर्य जयकुमार कटारे या पाच वर्षे वयाच्या आपल्या भावाला विहिरीत बुडताना स्वतः विहिरीत उडी मारून त्याचे प्राण वाचवले, शनिवारी माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या परिवाराची भेट घेऊन कु. नम्रता हिचे कौतुक केले. घरातील सर्व वडीलधारी मंडळी व महिला घर व शेती कामात व्यस्त असताना अंगणात खेळत असलेला पाच वर्षाचा शौर्य खेळता खेळता घराशेजारील विहिरीत पडला अतिवृष्टीमुळे विहीर तुडुंब भरलेली होती विहिरीत पडलेल्या शौर्यने मदतीसाठी आरडा ओरड केली, यावेळी विहिरी जवळच असलेल्या कुमारी नम्रता हिने घरच्यांना हाक दिली व आपण स्वतः विहिरीत उडी मारून पाण्यात बुडणाऱ्या आपल्या भावाला वाचवले, दानोळी येथे जाऊन कटारे कुटुंबाची भेट घेतल्यानंतर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तातडीने जिल्हाधिकारी कोल्हापूर व तहसीलदार शिरोळ यांच्याशी दूरध्वनी म्हणून संपर्क साधत कुमारी नम्रता हिला तिने प्रसंगावधान राखून केलेल्या साहसा बद्दल केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणारा शौर्य पुरस्कार मिळावा आणि यासाठी आवश्यक तो प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने सादर करावा अशा सूचना दिल्या यावेळी कुमारी नम्रताचे वडील महावीर कटारे, पिंटू पाराज, सुकुमार सकाप्पा, सतीश मलमे, विकास वाळकुंजे, आण्णासो पोलीस पाटील, उदय राऊत, परेल सावंत, संजय नांदणे, अजित उपाध्ये यांच्यासह कटारे परिवारातील महिला भगिनी उपस्थित होत्या.
