Top News

उत्तरप्रदेशमधील वेटलिफ्टिंग स्पर्धेत भूमिकाने रोवला हेरवाडचा झेंडा

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

उत्तरप्रदेश गाझियाबाद येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया नॅशनल रँकिंग वोमेन वेटलिफ्टिंग स्पर्धेत 55 कीलो वजनी गटात हेरवाडची कन्या भूमिका राजेंद्र मोहिते हिने तृतीय क्रमांक पटकावून यश संपादन केले आहे. 

उत्तरप्रदेश गाझियाबाद येथे खेलो इंडिया नॅशनल रँकिंग वोमेन वेटलिफ्टिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेसाठी देशभरातून अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत. यावेळी झालेल्या 55 कीलो वजनी गटात हेरवाडची कन्या भूमिका राजेंद्र मोहिते हिने तृतीय क्रमांक पटकावून यश संपादन केले आहे. या अगोदरही भूमिका हिने वेटलिफ्टिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करून हेरवाड गांवचे नांव उज्वल केले आहे. 

 तिला हरक्यूलस जीमचे प्रदीप पाटील यांचे मोलाचे योगदान मार्गदर्शन लाभले आहे तर श्रध्दा पोवार,विजय टारे यांचे सहकार्य लाभले.

थोडे नवीन जरा जुने