Top News

म्हैस पळविण्याच्या स्पर्धेत ओंकार पायमल यांची म्हैस प्रथम

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क 

हेरवाड येथील ग्रामदैवत श्री संतुबाई देवीच्या यात्रेेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या म्हैस पळविण्याच्या स्पर्धेत ओंकार पायमल - कोल्हापूर यांची म्हैस प्रथम आली. 

येथील हेरवाड-अब्दुललाट मार्गावर या स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रथम क्रमांक ओंकार पायमल, कोल्हापूर, व्दितीय क्रमांक सुनिल बंडगर, मिरज तर तृतीय क्रमांक सचिन गाडगीळ, पाचगांव यांच्या म्हैशीने पटकाविला. यावेळी आर.बी.पाटील, सरपंच सुरगोंडा पाटील, सुकूमार पाटील, अनिल अकिवाटे, संजय पुजारी, वैभव शेबडे, तम्मान्ना पुजारी यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वितरण करण्यात आले. ही स्पर्धा पाहण्यासाठी हेरवाडसह परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने