हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क
तब्बल 27 वर्षानंतर दिवाळीच्या सणांमध्ये आलेला सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद अबालवृद्धांनी घेतला.
उत्तर व पश्चिम भारतात खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार होते. सायंकाळी4.49 मिनिटांनी सुरु झालेले खंडग्रास सूर्यग्रहण सायंकाळी 6.09 मिनिटांपर्यंत सुरु होते.
21 व्या शतका पोहचूनही लोकांच्यामध्ये अजूनही अंधश्रद्धा रुजलेली दिसून येत होती. गरोदर स्त्रिया, वृध्द लोक व लहानग्यांना ग्रहणांपासून दूर ठेवले जात होते. जिल्हयात अनेक ठिकाणी मंदिरे बंद ठेवण्यात आली होती.
