हेरवाड येथील ग्रामदैवत श्री संतुबाई देवीच्या यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक, भव्य जंगी कुस्त्या, किर्तन, शर्यती यासह विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या कोरोनाचे संकट टळल्यामुळे यात्रा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी होत आहे.
यात्रेनिनिमित्त बुधवार दि. २६ रोजी सकाळी भव्य मॅरेथॉन स्पर्धा, यानंतर हातगाडा शर्यत, भव्य पालखी मिरवणूक, रात्री १० वाजता भव्य धनगरी ढोल वादन स्पर्धा, गुरुवार दि. २७ रोजी मेंढी पळविणे स्पर्धा, दुपारी १२ वाजता श्वान पळविणे स्पर्धा, रात्री ९ वाजता भव्य धनगरी कन्नड गायन व सवाल जवाब कार्यक्रम, रात्री १० वाजता मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे. याचबरोबर शुक्रवारदि. २८ रोजी भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान होणार आहे. विजेत्या मल्लाला आकर्षक बक्षिसासह चांदीची गदा देण्यात येणार आहे. याच दिवशी रात्री १० वाजता मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे. शनिवार दि. २९ रोजी म्हैस पळविणे स्पर्धा, मल्लखांब स्पर्धा होणार आहे. याचबरोबर सायंकाळी ६ वाजता हभप किशोरजी महाराज कोकाटे यांचेकिर्तन होणार आहे. याच दिवशी रात्री १० वाजता श्री संतुबाई मंदिर माळभाव या ठिकाणी भव्य धनगरी ओव्यांचा कार्यक्रम व बक्षीस समारंभ होणार आहे. रविवार दि. ३० रोजी ग्रामपंचायत पटांगण येथे भव्य हलगीवादन स्पर्धा होणार आहेत. या विविध कार्यक्रमासाठी खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आण्णा आवाडे, मा. खासदारराजू शेट्टी, आ.आमदार उल्हासदादा पाटील, गुरुदत्तचे चेअरमन माधवराव घाटगे, दत्त चे चेअरमन गणपतरावदादा पाटील, बोरगांवचे युवा नेते उत्तम आण्णा पाटील, अनिलराव यादव, राजवर्धन नाईक निंबाळकर, सागर पाटील, पृथ्वीराजसिंह यादव, मा. सभापती मिनाज जमादार, राहूल घाटगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
