हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क
हेरवाडची ग्रामदैवत श्री.संतुबाई देवीच्या यात्रेनिमित्त उदया बुधवार दि.26 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खुला गटासाठी बक्षिसे अनुक्रमे प्रथम क्रमांकांसाठी -5001 रु.द्वितीय क्रमांकांसाठी 3001 रू.तर तृतीय क्रमांकांसाठी 2001 रु. चे बक्षिसे आहेत.
तर 14 वर्षाखालील मुलांसाठी बक्षिसे प्रथम क्रमांकांसाठी 3001रु.द्वितीय क्रमांकांसाठी2001रु.तर तृतीय क्रमांकांसाठी 1001रु.चे बक्षिसे आहेत. भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांच्या हस्ते होणार आहे. तर अध्यक्षस्थानी गुरुदत्तचे राहूल घाटगे उपस्थित राहणार आहेत.
