हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाडचे ग्रामदैवत श्री संतुबाई देवीची यात्रेनिमित्त आज बुधवारी दुपारी १२ वाजता लहान गट व मोठा गटाच्या हातगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मोठ्या गटासाठी प्रथम क्रमांक १५०१, द्वितीय क्रमांक १००१, तृतीय ७०१ तर लहान गटासाठी प्रथम क्रमांक १००१, द्वितीय क्रमांक ७०१ व तृतीय क्रमांकासाठी ५०१ रुपयांचे बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन संभाजी माने सोसायटीचे चेअरमन सदाशिव मस्के तसेच ताराश्री विकास सोसायटीचे चेअरमन महादेव गुरव यांच्या हस्ते होणार आहे.

