Top News

अकिवाट येथे किल्ला स्पर्धेला मोठा प्रतिसाद

 


   अकिवाट / शिवार न्यूज नेटवर्क :

          येथील शिवप्रेमी मंडळातर्फे भव्य किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेमध्ये अकिवाट गावातील एकून १९ स्पर्धकांनी सहभाग नोंदवीला होता.सिंधूदुर्ग,प्रतापगड,मल्हारगड,जंजीरा,पद्मदुर्ग अशा किल्ल्यांची प्रतिकृती स्पर्धकांनी तयार केली होती.तसेच परिक्षकांना किल्ल्याची संपुर्ण माहीती व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आहे.या स्पर्धेच्या बक्षिस वितरणा समारंभासाठी श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष रावसाहेब देसाई तसेच सरपंच विशाल चौगुले प्रमुख उपस्थिती होते.

       लेखक,साहित्यिक, वैद्य अशोक गायकवाड,चिमासाहेब पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले.परिक्षक म्हणून अशोक कोळी सर,आनंदा गायकवाड सर,उळागड्डे सर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रथम क्रमांक वेगा फॕन्स ,द्वितीय क्रमांक बाल सन्मित्र,तृतीय क्रमांक नव भारत या ग्रुपने क्रमाआक पटकावला.

       यावेळी ग्रा.प.सदस्य विठ्ठल गायकवाड,पोपट पाटील,तलाठी सुरज माने,रावसाहेब कुंभार,पांडूरंग तवंदकर ,कुमार तवंदकर ,संतोष गायकवाड,रावसाहेब कदम,रतनचंद नाईक,अमोल माने,निंगाप्पा कटेकरी तसेच शिवप्रेमी मंडळाचे सदस्य उपस्थितीत होते.  स्वागत व प्रास्तविक निलेश तवंदकर व आभार आशितोष पवार यांनी मानले.  यावेळी मंडळाचे बाळकृष्ण गायकवाड,चेतन कोळी,आयुष गायकवाड,विनायक कोळी,अतुल गायकवाड ,मनोज तवंदकर,संस्कार कदम,प्रणव कुंभार,आदर्श तवंदकर,संदिप तवंदकर,सक्षम कुंभार,वेदांत थोरवत,योगेश तवंदकर,तानाजी पवार,श्रीराम हुजरे,वेदांत कदम,दसरथ इंगळे,सोहम कदम,कृष्णा कोळी,चिन्मय तवंदकर ,समर्थ गायकवाड ,संकेत तवंदकर,बाळु कोळी,तेजस हुजरे,शुभम हुजरे,शुभम लाटवडे,गणेश कुंभार ,अनुराग तवंदकर,साईराज तवंदकर व इतर सदस्य उपस्थितीत होते.

थोडे नवीन जरा जुने