Top News

सदलगा येथील स्वामी समर्थ दूध संघाकडून दूध उत्पादकांना उच्चांकी बोनस वाटप


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क

सदलगा येथील स्वामी समर्थ दूध संघाकडून संघाच्या सभासदना म्हैस दुधास शेकडा 5 टक्के रुपये प्रमाणे व गाय दूध उत्पादकांनाही उच्चांकी बोनस वितरण करण्यात येत असल्याचे दूध उत्पादक संघाचे चेअरमन सिद्धू पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांच्या उत्पादित दुधाला योग्य फॅट व रास्त भाव मिळवा,शिवाय गवळी व खासगी दूध विक्रेत्यांकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांंची होणारी फसवणूक थांबावी,यासाठी आपण दूध डेअरीची स्थापना केली आहे.याचा नक्कीच शेतकऱ्यानं बरोबर महिला वर्गाला नक्कीच फायदा होत आहे.शेतकऱ्यांचा दुय्यम व्यवसाय हा असल्याने आपण दूध संघा बरोबर सभासंदच्या हिताला अधिक महत्व देत सर्वाधिक बोनस देण्याची परंपरा कायम ठेवली असल्याचेही सांगितले.

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही डेअरीला विक्रमी दूध पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांमध्ये उमेश माने ,अनिल अनाजे, नंदकुमार घंगाळे ,हन्नाप्पा जीनाई , कोडेप्पा गावडे, तसेच गाय दूध उत्पादनामध्ये सर्वाधिक दूध पुरवठा केलेल्या रावसाहेब खोबरे महेश माने लगमन्ना बत्ते, अवण्णा गावडे, रामू घोबडे यासर्व शेतकरी दूध उत्पादकांना संस्थे मार्फत भेट- वस्तूनसह शाल-श्रीफळ देऊन सर्वांना  गौरविण्यात आले.

चालू वर्षी दूध डेअरी मार्फत 1 लाख,7 हजार,498 लिटर दूध संकलन करून सभासदाना 03 लाख,22हजार,494रुपये इतका विक्रमी बोनस वितरित करण्यात आला आहे.

  याप्रसंगी सिद्धू पाटील, गणपती वास्कर ,राहुल घाटगे, वैभव पाटील, बाबू रेंदाळे, उमेश पाटील, भीमगोंडा मुधाळे, अण्णासो पाटील ,सुनील जाधव ,रामा लोकरे ,पिंटू मोकाशी, रावसाहेब श्यामजे ,शिवानंद घाटगे , वीरूपाक्ष भोजने, कुमार पाटील, सुरेश घोबडे यांच्यासह दूर उत्पादक व ग्राहक शेतकरी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने