सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
मागील एक वर्ष साखरेला 3500 रुपया पेक्षा जादा दर मिळालेला आहे आणि इथेनॉल पासून कारखान्यांना जादाचे उत्पन्न मिळाले असून यावर्षी frp पेक्षा जादा rsf निघणार असल्यामुळे नवीन हंगामा पूर्वी मागच्या हंगामा चा rsf निश्चित करावा व हंगाम सुरु होण्यापूर्वी तो शेतकऱ्यांना दिला जावा अशी मागणी आंदोलन अंकुश ने पुणे येथे साखर आयुक्तांना भेटून केली.
सी रंगराजन समिती च्या 70:30 सूत्रानुसार साखर व उप पदार्थाचे एकूण उत्पन्न काढून त्यातील 70% रक्कम शेतकऱ्यांना देण्याचा रेव्हिन्यू शेअरिंग फॉर्म्युला ( rsf ) चा 2013 चा कायदा आहे. त्यानुसार हंगाम संपल्यावर 120 दिवसात कारखान्यांनी आपले हिशोब साखर आयुक्तालयास सादर करायचे असतात आणि ते हिशोब तपासून आयुक्तालयाने प्रत्येक कारखान्याचा rsf ठरवायचा असतो. काही वर्षे साखरेला दर कमी मिळत होता म्हणून rsf हा frp पेक्षा कमी निघत होता पण मागील एक वर्ष साखरेला 3500 रुपये क्विंटल दर मिळत आहे व उप पदार्थाना सुद्धा चांगला दर मिळाल्यामुळे यावर्षी rsf हा frp पेक्षा जादा मिळणार आहे त्यामुळेच आंदोलन अंकुश ने rsf ची मागणी साखर आयुक्तांकडे केली आहे.
