Top News

आमदार यड्रावकर यांनी दिल्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना

नृसिंहवाडीतील आंदोलन मागे


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

मिरज ते दतवाड रस्त्याच्या  सुुरु असलेल्या कामामुळे अपघात होत आहेत. हे काम तात्काळ आणि मजबूत व्हावे या मागणीसाठी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कमानीजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आंदोलकांची भेट घेवून चर्चा केली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना दिल्या. आमदार यड्रावकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशामुळे आंदोलन कर्त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले.

      सागर धनवडे, गुरुप्रसाद धनवडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. दरम्यान, याचवेळी माजीमंत्री, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर याच मार्गाने पुर्व नियोजित दौर्‍यासाठी जात होते. त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. रस्त्याच्या कामासंदर्भात सर्व परिस्थिती व माहिती जाणून घेतली. कुरुंदवाड पुलावरील रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच नृसिंहवाडी स्वागत कमानीजवळ मिरज ते दतवाड रस्त्याचे काम धोकादायक पद्धतीने  सुरु  आहे. यामुळे बरेचसे अपघात झालेले आहेत असे सागर धनवडे यांनी  सांगितले. यावेळी आमदार यड्रावकर यांनी रस्त्याची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच तेथे उपस्थिीत सुपरवायझर व कर्मचारी यांना  महत्त्वाच्या सूचना दिल्या. नृसिंहवाडी स्वागत कमानीजवळ चालू असलेले काम थांबवून उतार न करता कमानीच्या आतपर्यंत तात्काळ रस्ता करण्याचे आश्वासन दिल्यानंतर  आंदोलन मागे घेण्यात आले.

 यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रितम साळुंखे, सागर मोरबाळे, गिरीश कंदले, तुषार कुन्नरे, बजरंग खिरगुडे, अवधूत म्हैशाळकर, अवधूत सावंत, राकेश खिरगुडे, केवल परमार, यश साळुंखे, नागरिक व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने