हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाडमधील वार्ड नं ३ मध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळल्याचे वृत्त शिवार न्यूज नेटवर्कने दिल्यानंतर गावातील प्रशासन आणि आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे. सध्या गावात औषध फवारणीसह आरोग्य तपासणीचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे, त्यामुळे पाणी साचून राहिल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. गावातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली होती तसेच तपासणीनंतर संशयित ४ रुग्ण आढळले आहेत. संबंधित विभागाला माहित नसल्यामुळे डेंग्यूच्या पार्श्वभूमिवर या प्रभागात उपाय योजना करण्यात आलेल्या नव्हत्या, या डेंग्यूचे रुग्ण आढळल्याचे वृत्त शिवार न्यूज नेटवर्कने दिल्यानंतर गावातील प्रशासन आणि आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे. सध्या गावात औषध फवारणीसह आरोग्य तपासणीचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे.

