जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
दत्त नागरी पत संस्थेने सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून व संस्थेच्या संचालक मंडळाने पारदर्शी कारभार करून संस्थेला उर्जितावस्था आणणेसाठी आम्ही सर्वजन प्रयत्नशिल आहोत. येणाऱ्या काळ हा संस्थेला गतवैभव प्राप्त होईल याबदल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही, असा विश्वास गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी व्यक्त केला. श्री दत्त नागरी सह पत संस्थेची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कल्पवृक्ष गार्डन येथे पार पडली. त्याप्रंसगी श्री . घाटगे बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक चेअरमन शिवाजीराव माने- देशमुख यांनी केले. जनरल मॅनेजर राजेंद्र चव्हाण यांनी विषय पत्रिकेचे वाचन केल्यानंतर सर्व सभासदांनी टाळ्याच्या गजरेत सर्व विषय एकमतांने मंजूर केले.
यावेळी बोलताना श्री. घाटगे म्हणाले, दरवर्षी संस्थेच्या प्रगतीचा आलेख उच्चावत चालला आहे. सन २०२१- २२ या आर्थिक वर्षात ठेवी मध्ये १२ कोटी ५० लाखाची वाढ झाली असून एकूण ठेवी ७८ कोटीवर गेल्या आहेत. संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे. येणारा काळ हा दत्त नागरीचा सुवर्णकाळ असणार आहे. सभासद व शेतकरी यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी दत्त नागरी मोलाचा वाटा उचलणार असल्याचा विश्वास यावेळी श्री. घाटगे यांनी व्यक्त केला. भारतीय शुगर्स चा २०२२ चा राष्ट्रीय पातळीवरील 'सर्वात्कृष्ठ पर्यावरण संवर्धन' पुरस्कार गुरुदत्त शुगर्स ला प्राप्त झालेबदल चेअरमन माधवराव घाटगे यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सभेला संस्थेचे व्हा.चेअरमन धोंडीराम खोत, माजी व्हा. चेअरमन अशोक जगताप, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहूल घाटगे, धीरज घाटगे तसेच संचालक संजय गायकवाड, धोंडीराम नागणे, चिंचवाडचे माजी सरपंच विठ्ठल घाटगे, चिंचवाडच्या सरपंच ज्योती काटकर, ज्योती गोधडे, सर्व संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते. आभार संचालक भास्कर कांबळे यांनी मानले.
