सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील दे भ रत्नाप्पाण्णा कुंभार सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने निमशिरगाव (ता शिरोळ) येथील आई वृद्धाश्रम या संस्थेमध्ये वृद्ध मातांना प्रतिष्ठान संस्थेचे प्रमुख डॉ शंकर कुंभार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते आई वृद्धाश्रम या संस्थेमधील वृद्ध मातांना फळे वाटप करण्यात आले.
दरम्यान, गुरुवारी इचलकरंजी येथील पंचगंगा साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या स्मारकास डॉ शंकर कुंभार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यानंतर कार्यस्थळावर झालेल्या स्वर्गीय रत्नाप्पाण्णा कुंभार आदरांजली सभेत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ शंकर कुंभार म्हणाले, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार हे क्रांतिकारक होते, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करण्यासाठी शासनाने दे भ रत्नाप्पाण्णा यांना भारतरत्न हा किताब बहाल करावा तसेच थोर स्वातंत्र्य सेनानी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचा शाळेतील अभ्यासक्रमात धडा ठेवावा अशी मागणीही त्यांनी भाषणात केली, दे भ कुंभार पंचगंगा साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षा रजनीताई मगदूम सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.
यावेळी के डी सी बँकेचे निवृत्त अधिकारी राजेंद्र जगनाडे ,प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने, वंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्धीप्रमुख विश्वास कांबळे, सामाजिक कार्यकर्ते यल्लाप्पा नाईक, गोपीचंद गवळी, भीम कायदा संघटनेचे नेते अमोल मोहिते, राजू कांबळे यांच्यासह सामाजिक, सहकार, कृषी व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
